breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

घरावरील पत्रे कोसळल्याने दोन मुले गंभीर जखमी

जिंतूर |

जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात साजिद मिर्झा यांचे कच्चे बांधकाम असलेले घर आहे. या घरात साजिद मिर्झा हे त्यांची पत्नी दोन मुले आणि दोन मुलीसह वास्तव्यास आहेत. शहरात हातगाडीवर भाजीपाला विकून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.

रविवारी दुपारी त्यांची मुले शहेबाज (वय १७ वर्ष) व शाहरुख (वय १६) हे दोघे घरात मोबाइलवर अभ्यास करत बसले होते. यावेळी अचानक जोराचा आवाज आल्याने साजिद यांच्या पत्नीने धाव घेतली असता मागच्या खोलीवरील पत्रे आणि दगड कोसळून दोन्ही मुले गंभीर जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी आरडाओरडा करताच शेजारी राहणाऱ्या लोकांनी तत्काळ पत्रे व दगड हटवून जखमी मुलांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दोन्ही मुलांच्या डोके आणि कानाला गंभीर इजा झाली असून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button