breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘बिग बॉस 14’ सीजन मध्ये ‘No Physical Task’,No Touching…मग नक्की कसा होणार शो?

कलर्स टीव्हीवर 3 ऑक्टोबर पासून बिग बॉसच्या नव्या सीजनची सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरस संकट काळात सुरु होणाऱ्या ‘बिग बॉस 14’ सीजनकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉसच्या घरात इतके स्पर्धक एका घरात राहणार म्हटल्यावर सुरक्षा चोख राखणे गरजेचे आहे. तसंच घरात सोशल डिस्टसिंगचे पालन केले जाईल असे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सध्याच्या बिग बॉस शोमध्ये वेगळ काय दाखवणार हे पाहण्यसाठी सगळेच आतूर आहेत. त्यातच आता आणखी एक मोठी घोषणा बिग बॉसकडून करण्यात आली आहे. घरात कोणताही फिजिकल टास्क होणार नाही आणि दर आठवड्यात स्पर्धकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे आता मनोरंजनसाठी नेमके कशापद्धतीचे टास्क असणार याबाबत प्रेक्षकांनामध्ये उत्सुकता आहे.

बिग बॉस खबरीने याची माहिती इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. बिग बॉसमध्ये यंदा खूप काही बदलले दिसेल. यंदा घरात डबल बेड नसेल. तसंच बेड, प्लेट, ग्लास शेअरींगला परवानगी नसेल. विशेष म्हणजे यंदा कोणताही फिजिकल टास्क नसेल आणि दर आठवड्याला स्पर्धकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येईल. त्याचबरोबर यंदा बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी मिनी थिएटर, मॉल आणि रेस्टोरन्टची सुविधा देण्यात येईल.

कोविड-19 लॉकडाऊनमुळे कंटाळलेल्या लोकांना बिग बॉस 14 द्वारे मनोरंजनाचे दार खुले होईल. अद्याप बिग बॉसमधील स्पर्धकांची नावे जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे त्याबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. यंदाचा सीजन अधिक लोकप्रिय करण्यासाठी शो मध्ये मोठी नावे सहभागी करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे, असे बोलले जात होते. त्यामुळे या धमाकेदार शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.तसेच फिजिकल टास्कसाठी प्रसिद्ध असलेला हा शो आता फिजिकल टास्कशिवाय कसा काय रंगत आणणार हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button