breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत गार्डनमध्ये खेळताना खड्ड्यात पडून २ मुलांचा मृत्यू

मुंबई – अँटॉप हिल परिसरात गार्डनमध्ये खेळत असताना खड्ड्यात पडून २ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ११ वर्षीय यशकुमार चंद्रवंशी आणि ९ वर्षीय शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. सोमवारी हे दोघे गार्डनमध्ये खेळत होते, त्यावेळी पाईपलाईन दुरुस्तीकरीता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांकडून आता सीपीडब्लूडीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी होत आहे. यासंबंधी पोलिसांनी कॉन्ट्रॅक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉप हिल सी. जी. एस कॉलनी, सेक्टर ०७ येथील गार्डनमध्ये पाईपलाईन दुरुस्तीकरता खणण्यात आलेल्या खड्ड्यात पाणी साचून तिथे पाण्याचे डबके बनले होते. येथे खेळता-खेळता शिवम आणि यशकुमार हे दोघेही या खड्ड्यात पडले. या खड्ड्याच्या शेजारी कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळेच या दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, असा आरोप मृत मुलांच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, सदर मुलांना तात्काळ पाण्यातून बाहेर काढून सायन रुग्णालयात उपचाराकरता नेण्यात आले होते. परंतु रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button