breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर बलात्कार; एकास अटक

मुंबई । पनवेलमधील कोविड-19 क्वारंटाईन सेंटरमध्ये (विलगीकरण केंद्र)

एका ४० वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पनवेल झोन-२ चे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या केंद्रात कोविड-19 पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्ण दाखल आहेत. ‘त्या’ व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पनवेल येथे कोरोना क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या बलात्काराचे पडसाद उमटू लागले आहेत. विरोधी पक्षांनी यावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. या घटनेमुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी ट्विट करुन म्हटलंय की, पनवेलमध्ये क्वारंटाईन सेटंरमध्ये महिला रुग्णावर एका पुरुष रुग्णाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली, यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं. अशा बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा, त्यातूनही तो वाचलाच तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसचे बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाहीच अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button