breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Pele : महान फुटबॉलर पेले यांचे निधन ! ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तीन वेळा विश्वकप जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू

मुंबई : फुटबॉलमधील सर्वकालीन महान प्लेयर ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. पेले हा केवळ ब्राझीलमधीलच नव्हे तर जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. कोलन कॅन्सरमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पेले यांच्या निधनाने क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.
पेले यांना कोलोरेक्टर कन्सर झाला होता. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पेले यांनी यंदाचा नाताळ सण देखील रुग्णालयातच साजरा केला होता. मात्र तेथे यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली व त्यांच्या किडनी आणि हृदयावर परिणाम होत होता.
पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.
ब्राझीलला तीन वेळा वर्ल्डकप जिंकवून देणारा व तीन विश्वकप जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. ब्राझीलकडून खेळताना त्यांनी १९५८, १९६२ आणि १९६० मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. विश्वचषकात त्यांचे ७७ गोल केले आहेत. फुटबॉलच्या जगात पेले यांना ब्लॅक पर्ल आणि ब्लॅक डायमंड म्हणूनही ओळखले जात होते. आजच्या फुटबॉलच्या जगात मेस्सी आणि क्रि रोनाल्डोसारखे फुटबॉलपटू राज्य करत आहेत, परंतु अनेक चाहते अजूनही पेले यांना GOAT मानतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button