थेरगावमध्ये गुटखा वाहतूक प्रकरणी दोघांना अटक; ५ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी |
गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७७ हजार ७८१ रुपयांचा गुटखा व ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे एक चारचाकी वाहन, असा एकूण ५ लाख २७ हजार ७८१ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वाकड पोलिसांनी थेरगाव येथे शुक्रवारी (दि.२१) ही कारवाई केली. सवईराम कोजारामजी देवाशी (वय २६, रा. शिरगाव), प्रकाश गोपाराम देवाशी (वय २४, रा. रावेत), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुटखा व एक चारचाकी वाहन जप्त केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, परि २, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे- १) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे २) सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, अंमलदार संतोष पाटील, पोलीस नाईक कोळी, गायकवाड, पोलिस शिपाई दुधाळ, पोलीस नाईक चौधरी, पोलिस हवालदार ढोरजे, पोलिस नाईक गंभीरे, कुदळ, पोलिस शिपाई गिलबीले, लोखंडे, पाटील यांनी केली आहे.