breaking-newsआंतरराष्टीय

निवडणुका होईपर्यंत शरीफ राहणार तुरूंगातच

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कन्या मरियम यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकांवरील सुनावणी न्यायालयाने लांबणीवर टाकली. त्यामुळे त्या देशातील सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत शरीफ आणि मरियम यांना तुरूंगातच रहावे लागणार आहे. पाकिस्तानमधील न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी अलीकडेच शरीफ यांना दहा वर्षे तर मरियम यांना सात वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.
याशिवाय, शरीफ यांचे जावई मुहम्मद सफदर यांना एक वर्षाचा तुरूंगवास सुनावण्यात आला आहे. त्या तिघांनाही अटकेनंतर तुरूंगात ठेवण्यात आले आहे. शरीफ, मरियम आणि सफदर यांनी शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्यायालयाने चालू महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत तहकूूब ठेवली. त्यामुळे शरीफ, आणि मरियम यांच्या त्यांच्या पक्षाच्या (पीएमएल-एन) प्रचारात सहभागी होण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकांसाठी पाकिस्तानात 25 जुलैला मतदान होणार आहे. आजच्या घडामोडीमुळे प्रचार संपेपर्यंत तरी शरीफ आणि मरियम तुरूंगाबाहेर येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा फटका पीएमएल-एनला बसण्याची शक्‍यता आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button