breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांच्या प्रतिसादामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज दिवसभरात 7 हजार 358 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 641 पॉझीटिव्ह केसेस आढळून आल्या आहेत. आज 42 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यातील 28 रुग्ण पालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहेत. तर, उर्वरीत 14 पालिका हद्दीबाहेरील रहिवासी आहेत. दिवसभरात एकूण 5 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज दिवसभरात महापालिकेच्या 12 लसीकरण केंद्राद्वारे एकूण 1 हजार 263 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यातील 45 वर्षावरील 1 हजार 76 तर हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंट लाईन वर्कर्स 187 अशा एकूण 1263 जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. आजअखेर शहरातील एकूण 4 लाख 73 हजार 385 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या सतर्कतेमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिल्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे यातून दिसून येत आहे. आयुक्त राजेश पाटील रात्री उशीरापर्यंत कोरोनाशी संबंधित बाबींवर काम करत असल्यामुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचत आहेत. ऑक्सीजन उपलब्ध करणे, प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स आणि लस उपलब्ध करण्यासाठी त्यांना रात्री उशीरापर्यंत काम करावे लागत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी कोरोनाच्या निर्बंधाचे काटेकोर पालन करावे. कारण, तिस-या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता आतापासूनच उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायला हवे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button