TOP Newsताज्या घडामोडीपुणे

सहकार भारती पुरस्कृत पॅनलचे बारा उमेदवार बिनविरोध

पुणे : दि महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत होणार असून फेडरेशनच्या २१ जागांवर सहकार भारतीने सहकार पॅनेलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनेलचे बारा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फेडरेशनच्या २१ जागांसाठी एकूण ६१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सहकार भारती पुरस्कृत सहकार पॅनेलचे बारा उमेदवार बिनविरोध निवडणून आले आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था आहे. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींना मतदानाचा हक्क आहे.

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विधान परिषदेचे गटनेता प्रवीण दरेकर, अभुयदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सहकार भारतीच्या वतीने कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर रांगणेकर, अपना सहकारी बँक, मुंबईचे संचालक दत्ताराम चाळके, एनकेजीबीएसबी बँकेचे संचालक संदीप प्रभू, ठाणे भारत को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष उत्तम जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महिला गटामध्ये सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आणि नाशिक जिल्हा महिला देशात सर्वात जास्त नागरी सहकारी बँका राज्यात आहेत. सहकारी बँकांना नवी उभारी देण्यासाठी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहकार भारतीने निवडणुकीत विजयाचा संकल्प केला आहे, असे सहकार भारतीचे महाराष्ट्र महामंत्री विवेक जुगादे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button