breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘दिलासादायक’! लॉकडाऊनच्या काळात 21 दिवसांचा वाया गेलेल्या लोकल पासाबाबत चिंता नको

‘लॉकडाऊनच्या काळात उपनगरीय लोकल सेवेचा २१ दिवसांचा पास वाया गेला’, या चिंतेत असणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाकडून दिलासा मिळालाय . लॉकडाऊन काळात मुंबई लोकलसेवा बंद आहे. या दिवसांची भरपाई म्हणून मासिक पासला काही दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लॉकडाऊननंतर काही काळ सुरवातीला काढलेल्या त्याच पासवर प्रवास करता येणाऱ आहे…

लॉकडाऊनच्या काळात रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस तिकिटांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपनगरीय रेल्वेच्या तिकिटांसह मासिक पासवर रेल्वेकडून सबसिडी देण्यात येते. तसेच एपद्वारे पास काढल्यास ‘कॅशबॅक’ही मिळतो.

उपनगरीय रेल्वेच्या पासचे पैसे परत करण्याबाबत रेल्वेमध्ये कोणतेही धोरण नाही. मात्र, सर्वसामान्यांची गैरसोय लक्षात घेता, ‘विशेष प्रकरण’ म्हणून काही दिवस पास वाढवून देता येईल. याबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊनचे २१ दिवस भरपाई म्हणून काही दिवस पास वाढवून देण्याबाबत रेल्वे मंडळाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. मात्र विशेष प्रकरण म्हणून पासची मुदतवाढ देता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button