breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हळदीचे दूध शरीरासाठी जेवढे चांगले आहे तेवढेच आहे घातक, वाचा सविस्तर..

Turmeric Milk : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीचे दूध पिल्यानंतर शरीराला तात्काळ आराम मिळतो. हळद ही अँटीसेफ्टीक, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणांनी समृद्ध असल्याकारणाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही तात्काळ बरे होता. हळदीचे दूध जसे शरीरासाठी चांगले असते तसेच अपवादात्मक परिस्थिती ते शरीरासाठी घटक देखील असते. तर पाहुयात कोणत्या स्थितीत हळदीचे दूध पिऊ नये ते?

रक्ताची कमतरता

शरीरात हिमोग्लोबिनचे कमतरता असल्यास आयर्नयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने फायदा होऊ शकतो. मात्र दुधाचे सेवन केल्याने शरीरात मुबलक प्रमाणात आयर्न शोषले जात नाही. परिणामी पाहिजे त्या प्रमाणात हिमोग्लोबीन तयार होत नाही. त्यामुळे रक्ताची कमतरता असलेल्यांनी हळदीचे दूध पिणे टाळावे.

लिव्हर प्रॉब्लेम

ज्यांना लिव्हरचा आजार आहे अशांनी हळदीचे दूध पिल्यास त्यांना यापासून मोठे नुकसान होऊ शकते. परिणामी लिव्हरच्या समस्यांत अजून वाढ होऊ शकते.

हेही वाचा – भारतात दिसणार आज वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; या गोष्टी टाळा, काय सांगतात नियम?

किडनीच्या समस्या

शास्त्रज्ञांनी केलेल्या एका रिसर्चनुसार हळदीमध्ये करक्युमिन नावाचे तत्व आढळून आल्याचे सिद्ध झाले आहे. या करक्युमिन तत्वात ऑक्सलेटस जास्त प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे मुतखड्याचा त्रास बळावू शकतो. तसेच यामुळे तुमची किडनी देखील निकामी होऊ शकते.

हळद रक्त पातळ करते

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल की हळद ही रक्त पातळ करण्याचं देखील काम करते. जे लोक आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असतील अशा लोकांमध्ये हळदीचे सेवन केल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो त्यामुळे अशांनी हळदीपासून थोडे लांबच राहावे.

हळदीची ऍलर्जी

दुर्मिळ परिस्थितीत काही लोकांना हळदीची ऍलर्जी होऊ शकते. यात बऱ्याच जणांना अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी हळदीपासून थोडे दूरच राहावे. तरी कोणाला असा त्रास जाणवला तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button