breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

भारतात दिसणार आज वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; या गोष्टी टाळा, काय सांगतात नियम?

Chandra Grahan 2023 : ग्रहणाचा विषय आज मांडायचे कारण म्हणजे या वर्षातील म्हणजेच 2023 या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. धार्मिकदृष्ट्या विचार केला तर या चंद्रग्रहणाला अनन्यसाधारण महत्व आहे.

२८ ऑक्टोबरला होणारे हे चंद्रग्रहण या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार असून विशेष म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळत आहे. या ग्रहणाचा सुतक कालावधी हा ९ तास आधी सुरू होणार असून या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

शनिवारी म्हणजेच २८ ऑक्टोबर या दिवशी ११ वाजून ३० विटांनी सुरू होणारे चंद्रग्रहण हे पहाटेच्या सुमारास २ वाजून २४ मिनिटांनी संपणार आहे. या ग्रहणाचा स्पर्श हा रात्री १ वाजून मिनिटांनी होणार आहे. ग्रहणाचा मध्य १ वाजून ४४ मिनिटांनी होणार असून मुक्ती ही २ वाजून २४ मिनिटांनी होणार आहे. याचाच अर्थ असा होतो की हे ग्रहण एकूण चार तास चोवीस मिनिटांचे असणार आहे. विशेष म्हणजे या ग्रहणात महत्वाचा कालावधी हा १ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे. या निमित्ताने पाहुयात चंद्रग्रहणाच्या संबंधित काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे.

हेही वाचा – भारतमातानगर दिघी ते भोसरी-आळंदी रस्ता ‘सुपरफास्ट’

ग्रहण सुरू होण्याच्या पहिले काय करू नये?

या ग्रहणाला सुतक कालावधी असणार असल्याने या चंद्रग्रहणाच्या काळात जेवण करू नये. स्वयंपाक केलेले पदार्थ हे चंद्रग्रहण काळात घरात ठेवल्याने अडचण येऊ शकते. आणि जरी असे स्वयंपाक केलेले पदार्थ तुम्हाला घरात ठेवायचे असल्यास त्या स्वयंपाक केलेल्या पदार्थांवर तुळशीचे पान जरूर ठेवावे.

ग्रहण झाल्यानंतर काय करावे?

शनिवारी होणाऱ्या चंद्रग्रहण संपल्यानंतर म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी २ वाजून २४ मिनिटांनंतर तुम्ही राहत असलेल्या संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button