breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीज देयके न भरलेल्या ग्राहकांना दणका; महावितरणकडून वीजपुरवठा खंडीत

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात महसुल घटल्याने राज्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच अनेक ग्राहकांनी वीज देयकेही भरले नसल्याने राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वीज देयके भरण्यासाठी आवाहन करण्यात येत असून ज्यांनी गेल्या १० महिन्यांत एक रुपयाही वीज देयके न भरलेल्या ८० लाख ३२ हजार वीज ग्राहकांनी महावितरणने वीजपुरवठा तोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांत भांडुप परिमंडळातील म्हणजेच मुंबई, ठाणे शहर, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील १ लाख ६३ हजार ९१५ घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांचा समावेश आहे. त्यांच्याकडे १७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

मुंबईत भांडुप ठाणे, नवी मुंबईत वीज तोडण्याची कारवाई सुरू झाली असून जवळपास २६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडून वीज थकबाकीवसुली सुरू झाली आहे. तर कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर आदी परिसरांचा समावेश असलेल्या कल्याण परिमंडळात २ लाख २२ हजार ३९१ ग्राहकांनी गेल्या १० महिन्यांत एकदाही देयक भरलेले नाही. त्यांच्याकडे २२२ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.

घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषीपंप अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांनी वीज देयके थकवली आहेत. एकूण ४८ हजार कोटी रुपये थकबाकीपैकी केवळ घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडेच ४४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीचा बोजा असह्य़ झाल्याने अखेर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना टाळेबंदी लागू केल्यापासूनचा कालावधी गृहीत धरून १ एप्रिल २०२० नंतर एक रुपयाही देयक न भरणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. असे एकूण ८० लाख ३२ हजार २८३ वीजग्राहक असून त्यांच्याकडे एकूण ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यात ४१ लाख ६ हजार घरगुती ग्राहकांकडे ३३८० कोटी रुपये, ३ लाख ९३ हजार ग्राहकांकडे ७२३ कोटी रुपये, ५७ हजार औद्योगिक ग्राहकांकडे २९६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर ३३ लाख १५ हजार कृषीपंपधारकांकडे ३७ हजार २३६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत १७५ कोटी रुपये थकीत

मुंबईतील कांजूरमार्ग-मुलुंड-भांडुप आदी पूर्व उपनगरांपासून मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, नवी मुंबई कर्जत, वसई-विरार, पनवेल आदी भागांतही महावितरण वीजपुरवठा करते. भांडुप परिमंडळात म्हणजेच ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई आणि लगतच्या भागात १ लाख ६३ हजार ९१५ घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहकांनी १ एप्रिल २०२० नंतर आतापर्यंत एकदाही वीज देयक भरलेले नाही. त्यांच्याकडे १७५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

हप्त्यांची सवलत : देयक थकबाकीदारांना वीजपुरवठा तोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, परंतु त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून देयक वसुलीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना थकबाकी भरण्यासाठी समान मासिक हप्ते करून देण्याची सवलतही देण्यात येत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button