breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार श्रीरंग बारणे यांची अब्जावधींची संपत्ती

पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. दहावी नापास असलेल्या श्रीरंग बारणे आणि त्यांची पत्नी सरिता यांची एकत्रित संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे.

व्यवसाय – शेती, विट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय
शिक्षण – 10 वी अनुत्तीर्ण (श्री फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड, पुणे बोर्ड)

श्रीरंग चंदू बारणे

2017-18 : 33 लाख 16 हजार 783 रुपये
2016-17 : 31 लाख 58 हजार 929 रुपये
2015 – 16 : 55 लाख 45 हजार 732 रुपये
2014 – 15 : 1 कोटी 74 लाख 31 हजार 553 रुपये
2013-14 : 74 लाख 38 हजार 520 रुपये

पत्नी सरिता श्रीरंग बारणे

2017-18 : 12 लाख 42 हजार 788 रुपये
2016-17 : 4 लाख 11 हजार 236 रुपये
2015 – 16 : 3 लाख 92 हजार 770 रुपये
2014 – 15 : 5 लाख 63 हजार 878 रुपये
2013-14 : 5 लाख 29 हजार 447 रुपये

हातातील रोख रक्कम

श्रीरंग बारणे – 36 लाख रुपये
पत्नी सरिता बारणे – 12 लाख रुपये
श्रीरंग बारणेंच्या गाड्या

मर्सिडीज बेन्झ — 56 लाख 6 हजार 418
टोयोटो फॉर्च्युनर – 40 लाख 12 हजार 475 रुपये
जडजवाहीर, सोनेचांदी

श्रीरंग बारणे –

हिऱ्याची अंगठी – 11 लाख 55 हजार 22 रुपये
सोने – 450 ग्रॅम (किंमत – 13 लाख 95 हजार रुपये)
घड्याळ – 50 हजार रुपये
मोबाईल – 44 हजार 500 रुपये
रिव्हॉल्व्हर – 35 हजार रुपये
पत्नी सरिता बारणे –

कर्णकुंड्या – 5 लाख 50 हजार रुपये
सोने – 700 ग्रॅम (किंमत – 21 लाख 70 हजार रुपये)
चांदी – 5 किलो (किंमत – 2 लाख 50 हजार रुपये)
घड्याळ – 30 हजार रुपये
मोबाईल – 40 हजार रुपये
श्रीरंग बारणे

जंगम मालमत्ता – 13 कोटी 20 लाख 88 हजार 964 रुपये
स्थावर मालमत्ता – 69 कोटी 60 लाख 57 हजार 856 रुपये
कर्ज – टोयाटो फायनान्स सर्व्हिसला 4 लाख 16 हजार 612 रुपये वाहन कर्ज देणे
पत्नी सरिता बारणे

जंगम मालमत्ता – 57 लाख 5 हजार 646 रुपये
स्थावर मालमत्ता – 18 कोटी 94 लाख 57 हजार 668 रुपये

मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याशी आहे. निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मावळमध्ये मतदान पार पडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button