breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबविण्यासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या

  • शिवसेना संघटक संतोष सौंदणकर यांचे सत्ताधारी भाजपला आवाहन
  • लसीकरण मोहीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करा

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी भाजपाने पुढील महिन्यात दहा लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी पालिकेतील केंद्र सरकारशी संवाद साधून त्या तुलनेत लसीचा साठा करून ठेवण्यासाठी सत्ताधा-यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. लसीकरणाचे दैनंदीन नियोजन करून त्याचा आढावा घेण्याची जबाबदारी सर्वपक्षीय गटनेत्यांवर सोपवावी. केवळ प्रसिध्दीलोलूप आणि हेतुपुरस्सर लसीकरणाचे श्रेय लाटण्याचे राजकारण भाजपाने करू नये. शहरातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन लसीकरणाला सुरूवात करावी, असे आवाहन शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपला केले आहे.

पाच राज्याच्या विधानसभा नवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे पासून 18 वर्षांपुढील व्यक्तींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण राबविण्याची घोषणा केली. त्यावर तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने एका महिन्यात दहा लाख लोकांना लस देण्याचे उद्दीष्ट समोर ठेवल्याचे सांगितले. उद्दीष्ठ मोठे असावे पण त्यासाठी आवश्यक सामग्री असणे गरजेचे आहे. जर दहा लाख लोकांचे लसीकरण करायचे असेल तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात लस उलपब्ध करावी लागणार आहे. आजघडीला रुग्णालयात यातना भोगत असलेल्या कोरोनाबाधित नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. पालिका प्रशासन कसेबसे मिळेत त्या ठिकाणावरून ऑक्सिजनचे टँकर आणत आहेत. त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या कामाचे श्रेय लाटण्यात सत्ताधारी मश्गूल आहेत. कोरोना काळात भाजपने राजकारण बाजुला ठेवून नागरिकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे, असे सौंदणकर यांनी म्हटले आहे.

दहा लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट प्राप्त करण्यासाठी भाजपने सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. प्रभागनिहाय लसीकरण मोहीम आखून त्याचा आढावा घेण्याचे अधिकार सर्वपक्षिय गटनेत्यांना द्यावेत. लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधी व अधिका-यांची कमिटी स्थापन करावी. दैनंदिन नियोजन करून लसीकरण राबवावे. कोरोनाचा उत्सव साजरा करण्याऐवजी 18 वर्षापुढील प्रत्येकाला आपण लस कशी देऊ शकतो, यावर भर दिला पाहिजे. सुरूवातीला फ्रंटलाईन वर्कर्स असलेले डॉक्टर्स, नर्स, पोलीस, महावितरणचे विद्युत कर्मचारी व अधिकारी, बँकांचे कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आदींना लस देण्यासाठी विशिष्ट योजना आखावी. या कामासाठी कर्मचा-यांची कमतरता भासणार आहे. कारण, शहरात कोरोना बाधितांची संख्या हजारोने वाढत आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ गुंतलेला आहे. अशातच आजअखेर 45 वर्षांपुढील सुमारे 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे. त्यांना दुसरा डोस देण्याचा कालावधी आलेला आहे. अशात या तीन लाख नागरिकांना दुसरा डोस देणार की नव्याने लसीकरण मोहीम तिव्र करणार, याचे भाजपच्या पदाधिका-यांनी चिंतन करावे. तसेच, त्यांना तीन लाख लोकांचे लसीकरण करण्यास दीड महिन्याचा कालावधी लागला. दीड महिन्याच्या कालावधीत जर तीन लाख लोकांनाच लस देण्याची यंत्रणा उपलब्ध असेल तर सत्ताधारी दहा लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट कसे पूर्ण करतील, असा सवाल सौंदणकर यांनी उपस्थित केला आहे.

सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर भाजपकडून जाहिरातबाजी सुरू आहे. भाजपचा उदोउदो करण्यापेक्षा जास्तीत जास्त नागरिकांना लसीचे डोस कसे मिळतील यावर लक्ष केंद्रीत करावे. टार्गेट पूर्ण करण्याअगोदर अपेक्षीत लसीचा साठा उपलब्ध करावा. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी, पदाधिका-यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून लसीसाठी विनंती करावी. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशाची जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवडला लस देताना त्यांना देशाचा विचार करावा लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना शहरातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विनंती करावी. तरच, पूर्ण क्षमतेने लसीकरण मोहीम राबविता येईल. निव्वळ राजकारण, दिखाऊपणा आणि प्रसिध्दीलोलुप हेतू समोर ठेवून काम केल्यास नागरिकांचे हाल होतील, शिवसेना हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा देखील सौंदणकर यांनी महापालिकेतील भाजपला दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button