breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

कामचुकार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंढेंनी केलं तात्काळ निलंबित

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. काल सकाळी सहा वाजता तुकाराम मुंढे अचानकपणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात हजर झाले. मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच कोरोना नियंत्रण कक्ष आहे. हा कक्ष २४ तास सुरू असतो. येथे कर्मचाऱ्यांना शिफ्टमध्ये बोलावण्यात येतं. मात्र रात्रपाळीत असलेले चार कर्मचारी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पडत नसल्याच मुंढेंच्या निर्दशनास आलं. कर्तव्यात कसूर केलेल्या किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांना तात्काळ आयुक्तांनी निलंबित केलं आहे.

यानंतर तुकाराम मुंढे यांनी अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला भेट दिली. तेथून शहरात प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले की नाही, याची पाहणी केली. मनपा आयुक्तांनी अचानकपणे विविध झोनमधील स्वच्छता निरीक्षकांना फोन लावून उलटतपासणी केली. कोण कुठे आहेत, ते लोकेशन तपासले. यानंतर तेथून पाचपावली, इंदोरा, धरमपेठ अशा काही ठिकाणी हजेरी शेडला भेट दिली.

तेथील हजेरी रजिस्टरची तपासणी केली. तेथेही काही स्वच्छता निरीक्षक व अन्य कर्मचारी कर्तव्यात कसूर करताना आढळले. त्यांनाही तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये आशीनगर झोन क्रमांक ९चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड, धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button