breaking-newsमुंबई

मेट्रो प्रवाशांसाठी विमा योजना

  • १०० किमी प्रवास केलेल्या पास, स्मार्ट कार्ड धारकांपुरती मर्यादित

मुंबई – घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी निरनिराळ्या सुविधांच्या पायघडय़ा घालणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड’चे (मेट्रो-१) प्रशासन आता प्रवाशांचा विमा उतरविणार आहे. नव्याने राबविलेल्या ‘रॉयल्टी प्रोग्राम’अंतर्गत २६ जानेवारीपर्यंत जो प्रवासी या मार्गावर १०० किमीचा प्रवास पूर्ण करेल त्याचा ४.५ लाख रुपयांचा विमा उतरविण्यात येणार आहे. केवळ मासिक पास आणि मेट्रो स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

मेट्रो-१ मार्गाला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१७-१८ या कालावधीत या मार्गिकेवरील प्रवाशांत १३ टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या या मार्गावर रोज सुमारे साडेतीन लाख प्रवासी ये-जा करतात. रोजच्या ३७८ फेऱ्यांमध्ये वाढ करून ३८६ करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या आणखी वाढावी यासाठी मेट्रो प्रशासन सध्या वेगवेगळ्या योजना राबवीत आहे.

याअंतर्गत अंधेरी ते साकीनाका या टप्प्यात वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने येथील ४५० कंपन्यांमधील २००हून अधिक कर्मचाऱ्यांना त्यांचा मासिक पास थेट कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्याची योजना राबविली आहे. मेट्रो स्थानकाच्या परिसरातील सुमारे एक हजार गृहनिर्माण संस्थांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना मेट्रोची माहिती दिली जाते. शिवाय हरविलेल्या वस्तू केंद्राच्या माध्यमातून मेट्रो स्थानक किंवा गाडय़ांमध्ये ग्राहकांच्या हरवलेल्या वस्तू त्यांना पुन्हा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता मात्र प्रवाशांचा थेट विमा उतरविण्याची तयारी मेट्रो-१ प्रशासनाने केली आहे. ‘रॉयल्टी प्रोग्राम’अंतर्गत मासिक पास आणि स्मार्ट कार्डधारकांना प्रति १० किलोमीटरच्या प्रवासासाठी १ पॉइंट देण्यात येईल. २६ जानेवारीपर्यंत जो प्रवासी १०० किमीचा प्रवास करून १० पॉइंटची कमाई करेल त्याच्या ४.५ लाख रुपयांचा अपघात विमा उतरविण्यात येईल. हा विमा एका वर्षांसाठी वैध राहील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button