TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसू नका; लिहिते व्हा’, दामोदर मावजो यांचा सल्ला

पिंपरीः आजच्या लेखकांनी मूग गिळून स्वस्थ बसण्याची वृत्ती अंगी बाळगू नये. ही वृत्ती स्वतःच्या स्वास्थसाठी योग्य असेल. मात्र समाजाच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार दामोदर मावजो यांनी दिला. फायटर झाल्याशिवाय रायटर होऊ शकत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ वतीने आयोजित डॉ. पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-पिंपरी-चिंचवड २०१६ आणि १८वे जागतिक मराठी संमेलन २०२३) यांच्या संकल्पनेतून ८९व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे होते. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, विद्यापीठाच्या विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथांच्या प्रकाशनासह ई-बुक तसेच संमेलनांच्या यू-ट्यूब चैनल्सचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच अमळनेर येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सपत्नीक विशेष सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दामोदर मावजो म्हणाले, भाषा ही एकमेकांशी जोडणारी आहे. कोकणी आणि मराठी भाषा अद्वैत आहे. बहुभाषिक संस्कृती पुढे नेण्यासाठी मराठी आणि कोकणी भाषेचे संमेलन घेण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. डॉ. पी. डी. पाटील यांनी संमेलनाच्या नियोजन यशस्वीपणे पार पाडले. 89 साहित्य संमेलनात साहित्य मंथन केले. या मंथनातून संचित अमृतकुंभ निर्माण केले. त्यांचे हे अमृतकुंभ मी सेवन केलेच या पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षण आणि साहित्य याचा फार घनिष्ठ संबंध आहे याचा मिलाफ पाटील यांनी घडवून आणला आहे. महाविद्यालयीन शिक्षणात साहित्य हा विषय अनिवार्य केला पाहिजे, असेही यावेळी त्यांनी अपेक्षा केली. सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, या विकसीत तंत्रज्ञानाची सांगड घालून नवीन पिढीसमोर मांडायला हवे. तरुण पिढीला आवडेल आशा साहित्याची निर्मिती झाली पाहिजे. समाजात जे बदल होत आहेत ते प्रतिबिंबित झाले पाहिजे.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रात्रंदिवस काम केले. आजही हे संमेलन काल परवा झाला असे वाटते. हा मिळालेला साहित्याचा आनंद विसरू शकत नाही. डॉ. पी. डी. पाटील यांनी ऐतिहासिक काम केले आहे. समाजाला भरभरून देण्याचे काम पाटील आजही त्याच उत्साहाने करीत आहे. समाजाचे देने म्हणून त्यांनी साहित्यावर प्रचंड खर्च केला आहे. समाज सुधारला पाहिजे. अंधश्रद्धेकडे न जाता नवविचारकडे वळण्यासाठी काम केले आहे, असे कौतुक पाटील यांचे केले.

रामदास फुटाणे म्हणाले, साहित्य संमेलनाला कायम जिवंत ठवण्याचे काम आजच्या प्रकाशनाच्या ग्रंथामुळे झाले. या ग्रंथामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल. साहित्य संमेलन हा उरूस होऊ नये. तरुणांना जगण्याची दिशा मिळाली पाहिजे. शिक्षण संस्था मध्ये संमेलन झाले पाहिजे असेही यावेळी ते म्हणाले.
रविंद शोभणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनाची परंपरा शतकाकडे चालली आहे. सामान्यांना प्रश्न विचारण्याचे बळ साहित्यिक देत असतो. लेखक समाजाचा घटक असून त्यांच्या उन्नतीसाठी झटत असतो. साहित्य हा समाजाचा आरसा नसून उद्गार आहे.

रमाकांत खलप म्हणाले, साहित्य संमेलनांचे शिवधनुष्य उचलण्याचे काम पाटील यांनी यशस्वीपणे केले आहे. आता यापुढे कोकणी आणि मराठी भाषेचे संयुक्त संमेलन घ्यावे. उपभाषांना देखील यात स्थान मिळावे. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उंचीवर गेले आहे. या संमेलनाचे ग्रंथरूपी काम करण्यास 7वर्षे गेली. अनेक दिग्गज साहित्यिक संमेलनात आले. हा अनुभव समाजाला देण्यासाठी पुढाकार घेतला. हा संमेलनाचा अनुभव कायम पाहता यावा हा प्रयत्न केला।असल्याचेयावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले.

ग्रंथाचे संपादक सुनील चव्हाण व श्रीधर लोणी यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आगळेवेगळे झालेले ‘साहित्य संचित ग्रंथ व ई बुक निर्मिती कशी झाली, मुलाखती, भाषेचा जागर, वैश्विक साहित्य निर्मिती करण्याची संधी मिळाली अशी भावना यावेळी दोघांनी व्यक्त केल्या. यावेळी 89 वे मराठी साहित्य संमेलन आयोजनात सहकारी त्यावेळच्या महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, सुनील महाजन, प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक सचिन ईटकर यांनी केले. ते म्हणाले, 89 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आयोजित केले होते. हे संमेलन वेगळ्या उंचीवर गेले आहे. संमेलनात विविध भाषेचे 3 हजाराहून साहित्यिक सहभागी झाले होते. यात ज्ञानपीठकारांची मुलाखती दिल्या होत्या. रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. साहित्यिक, कवी, रसिक यांच्या सहभागामुळे मराठी भाषेचा उत्सव रंगला होता. या सर्व उत्सवाची एकत्रित ग्रंथात उतरविण्यात आली आहे. या ग्रंथासाठी जेष्ठ साहित्यिक व ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तसेच यावेळी संमेलनाचा आढावा घेत माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. वर्षा तोडमल यांनी केले. तर ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आभार मानले.

डॉ. डी. वाय. विद्यापीठाच्यावतीने आयोजित डॉ. पी. डी. पाटील (स्वागताध्यक्ष ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-पिंपरी-चिंचवड २०१६ आणि १८वे जागतिक मराठी संमेलन २०२३) यांच्या संकल्पनेतून ८९व्या मराठी साहित्य संमेलनावर आधारित तसेच जागतिक मराठी संमेलनावर आधारित ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन शुक्रवारी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठाकार दामोदर मावजो (गोवा) यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील हे होते. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे व माजी कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, विद्यापीठाच्या विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथांच्या प्रकाशनासह ई-बुक तसेच संमेलनांच्या यू-ट्यूब चैनल्सचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button