breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Mumbai 26/11 Attacks : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १५ वर्षे पूर्ण!

Mumbai 26/11 Attacks : बरोबर आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी मुंबईवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामुळे संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात तब्बल १६६ लोक मारले तर ३०८ लोक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता.

हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील १४ पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. तर मुंबई पोलीस दलाला ९ दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. या सर्व कटू आठवणींना उजाळा देत शहिदांना श्रद्धांजली वाहूयात…

हेही वाचा  –  ‘लोकसभेला भाजपा २६, तर शिवसेना आणि अजित पवार गट..’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान 

या हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले. त्यांच्या नावावर एक नजर..

  1. हेमंत करकरे (मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख)
  2. तुकाराम अंबोळे (सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलीस)
  3. अशोक कामटे (अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर)
  4. विजय साळस्कर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), (एन्काउंटर स्पेशालिस्ट)
  5. मेजर संदीप उन्नीकृष्णन – एन.एस.जी. कमांडो अधिकारी

दरम्यान अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्‍यात आले होते. त्‍याला २०१२च्या नोव्‍हेंबरमध्‍येच फाशी देण्‍यात आली. परंतु, हल्‍ल्‍याने ज्‍यांना कधीही भरुन न निघणाऱ्या जखमा दिल्‍या, त्‍यांना न्‍याय मिळाला का? याचे उत्तर नाही असेच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button