breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून भरावा लागणार मोठा दंड

Income Tax Return : देशातील कमावत्या नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची सवय लावणे हे मोठे आव्हान पार केल्यानंतर आयकर विभागासमोर करदात्यांच्या संख्या वाढवण्याचे आव्हान उभे राहिले. पॅन-आधार जोडणीमुळे करदाते वाढण्यास मदत झाली. याला आयकर विभागाची माहितीचा पूर्वंभरण केलेले विवरणपत्र देण्याच्या योजनेची मदत झाली आहे. यामुळे देशभरातील कमावत्या नागरिकांपैकी कुणालाही आपले उत्पन्न सरकारपासून लपवता येऊ शकत नाही.

करदात्यांना आता इन्कम टॅक्स भरण्याची सवय लावण्याचे काम पूर्ण झाले असून आता आव्हान होते ते दिलेल्या मुदतीत विवरणपत्र भरण्याचे. ही सवय लागावी म्हणून आयकर विभागाने मागील वर्षापासून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची ३१ जुलै ही अंतिम तारीख वाढवून न देण्याचे धोरण अवलंबले. यावर्षी देखील प्राप्तिकर विभागाने कोणत्याही स्थितीत ३१ जुलै या अंतिम दिवसाला मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा – ‘संभाजी भिडेंना सहा महिने तरी देशाच्या बाहेर ठेवा’; बच्चू कडू यांची मागणी

तरीही काही सनदी लेखापालांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली जाईल, असा विश्वास अजूनही वाटतो आहे. मात्र प्रत्यक्षात आज, सोमवारी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा शेवटचा दिवस आहे हे मात्र नक्की.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button