breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कळवा-मुंब्रा येथून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अभिनेत्री दीपाली सय्यद रिंगणात

मुंबई | महाईन्यूज

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेने कालच पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांना मैदानात उतरवले आहे. त्यांनी महायुतीच्या उमेदवारीवर या मतदार संघातून अर्ज भरला आहे.

अर्ज दाखल केल्यानंतरच सय्यद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली. गेल्या दहा वर्षात मतदार संघाचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे आहे. आणि ज्या ठिकाणी आव्हान असते त्याठिकाणी दीपाली असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. शिवसेनेने प्लॅटफॉर्म दिला म्हणूनच मी अभिनेत्री झाले. शिवसेनेत असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. माझा विजय पक्का आहे, हे कोणीही टाळू शकत नाही, असेही दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

दीपाली माझी बहिण आहे. शिवसेनेकडून ती ही मतदार संघात येत आहे. लोकशाहित तिलाही प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. पुढील पंधरा दिवसांत आव्हाड पाहिजे की दीपाली याचा निर्णय लोकंच घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

पंधरा दिवसांपूर्वी आलेली आमची माहेरवासीण बहिण दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था येथील जनता करेल. एक खास गीत गाऊन जितेंद्र आव्हाड यांनी दीपाली सय्यद हिला टोला लगावला. “बाबुल की दुवाँए ले की जा, जा तुझको सुखी संसार मिले… मायके की कभी ना याद आए… ससुराल मे इतना प्यार मिले…”, हे गीत गाऊन आमच्या माहेरवासिण बहिणीला येथील जनता खूप प्रेम देईल, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button