breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Diwali 2023 : दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

Vasubaras 2023 : दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा वसूबारस ही ९ नोव्हेंबरला म्हणजेच आज आहे. वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आहे. आज वसूबारस आणि रमा एकादशी देखील आहे.

अशाप्रकारे करा वसूबारसची पूजा?

लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाय-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाय-वासराच्या पायांवर पाणी घालतात, हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. गाय-वासराला कुंकू-हळद आणि अक्षदा वाहिल्यानंतर त्यांना निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाय-वासराला खायला दिला जातो.

हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक

आजच्या दिवशी रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा आजच्या दिवशी लावला जातो. तसेच या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. हे पदार्थ गाय-वासराला खाऊ घातले जातात. हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरूवात केली जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button