breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची वाहने, हलकी व जड-अवजड वाहने यांची वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत म्हणजे तब्बल ६ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे.

ब्लॉक दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याच्या बाजूने मुंबईकडे येणारी वाहने पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळवण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘Mega Celebration’ planned on MLA Mahesh Landge’s birthday 

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झि वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button