breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

TMC म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’, पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. बंगालमध्ये सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान मोदी देखील मैदानात उतरले असून, जोरदार प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान मोदींनी पुरुलिया येथील रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली.
आधी डावे आणि नंतर टीएमसी सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्दतीचं काम व्हायला हवं होतं तसं काम झालं नाही. पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याची मला कल्पना आहे. टीएमसी सरकार आपल्या खेळात व्यस्त असून शेतीकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

भाजपच्या केंद्र सरकारचे धोरण आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन, असा सणसणीत टोला देखील मोदींनी यावेळी ममता बॅनर्जींना लगावला. बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तुमच्या प्रश्नांना प्राथमिकता देत ते सोडवले जातील. बंगालमध्ये डबल इंजिनची सरकार बनेल. एक दिल्लीचं इंजिन आणि दुरसं बंगालचं इंजिन, जेव्हा डबल इंजिनची सरकारी बनेल, तर विकासही होईल आणि जीवनही सोपं होईल, असेही मोदी म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button