breaking-newsपुणे

‘मनाचे सौंदर्य पाहून लग्नाची गाठ बांधा’; रमेश घोलप

बारी समाज वधू -वर परिचय मेळाव्यात 300 विवाहच्छुकांनी दिला परिचय

पुणे : आयुष्यात लग्न करताना बाहेरील सौंदर्य न बघता मनाचे सौंदर्य बघुन लग्नाची गाठ बांधायला हवी, विवाह इच्छुक उपवधु-वरांनी आयुष्यात तडजोड केली तरच पुढील आयुष्य सुखकर होईल, असे प्रतिपादन रमेश घोलप यांनी केले. पुणे येथे बारी समाज विकास मंडळातर्फे उप वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. घोलप बोलत होते.

हेही वाचा – यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर

बारी समाज विकास मंडळ पुणे ९ वा उप वधू वर परिचय मेळावा हॉटेल सेंट्रल पार्क,आपटे रोड, शिवाजीनगर या ठिकाणी पार पडला. यावेळी, व्यासपीठावर रमेशचंद्र घोलप, रमेश डब्बे, सुनील नागपुरे, राजेंद्र बनसोडे, यशवंत बनसोडे, भानुदास दाभाडे, विजय बारी, मनोहर लोढे, सुमतीताई बारी, ओंकार काटोले, मोहिनी इंगोले, वैशाली अस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात 300 युवक- युवती यांनी आपला परिचय दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव मनोहर लोढे यांनी केले. सूत्रसंचालन भरत बारी यांनी केले. चैतन्य बेले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भानुदास दाभाडे, विजय रघुनाथ बारी, मनोहर लोढे, चैतन्य बेले, भरत बारी, योगेश पाटील, नितीन दुधे, प्रशांत बारी, संतोष तोटे, कृष्णा पाटील, राहुल पोकळे, प्रवीण तोटे, दिगंबर निमकर, नरेंद्र बारी, विजय बारी, राजेश ताडे, प्रदीप पाटील, मोहिनी इंगोले हेमलता नागपुरे, अरुण तोटे, बळीराम नागपुरे, मधुकर इंगोले आदींनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button