breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. बी.डी कुलकर्णी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

पुणे : ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. बी.डी कुलकर्णी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अर्थशास्त्र परिवारामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. बी.डी कुलकर्णी यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये प्रोफेसर, विभाग प्रमुख व इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या होत्या. त्यांना ३८ वर्षांचा अध्ययन, अध्यापन व संशोधनाचा अनुभव होता.

डॉ. बी.डी कुलकर्णी यांनी अर्थशास्त्र विषयावर २२ पुस्तके लिहिलेली आहेत. शिवाय व्यापारी मित्र, योजना व इतर विविध मासिकांसाठी त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ विद्यार्थ्यांनी पीएचडी प्रप्त केली असून २७ विद्यार्थांना मार्गदर्शनही केले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंधक ही त्यांचे प्रसिद्ध झालेले. अर्थकारण व भारतीय शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. अर्थशास्भाची मांडणी ते सहज व सोप्या पद्धतीने करण्याती हातोटी त्यांच्याकडे होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button