ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्हाट्सअपवर मुलींचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालवणा-या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड | व्हाट्सअपवर मुलींचे फोटो पाठवून वेश्याव्यवसाय चालवणा-या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यातून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी (दि.18) सायंकाळी सहाच्या सुमारास कामिनी हॉटेल, अहिंसा चौक, चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी जॅक, करण, बबलु (पूर्ण नावे माहीत नाहीत) यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या ठिकाणावरून 4 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल कामिनी येथे एक इसम जॅक हे नाव वापरुन व्हॉट्सॲप वरुन वेगवेगळ्या मुलींचे फोटो गि-हाईकांना पाठवून वेश्याव्यवसायाठी मुलींची निवड करण्यास सांगतो. त्यानंतर गिन्हाईकाने वेश्यागमनासाठी मुलींची निवड केल्यास वेगवेगळ्या हॉटेलवर गि-हाईकांना बोलावुन तेथे मुलींच्या नावावर हॉटेलमध्ये रुम बुक करुन वेश्यागमनासाठी गि-हाईकांना येण्यास सांगतो. आणि मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतो.

सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी हॉटेल कामिनी येथे डिकॉय कस्टमर पाठवुन वेश्या व्यवसाय चालतो याची खात्री केली. सायंकाळी सहाच्या सुमारास येथे छापा टाकून दोन दिल्ली व एक छत्तीसगड येथील अशा तीन पिडीत महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button