breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

INDvsAUS : रवींद्र जडेजाचा जबरदस्त कमबॅक; १७७ धावांत आटोपला पहिला डाव

जडेजा-आश्विनच्या फिरकीची कमाल

भारत विरूद्ध ऑस्ट्रोलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीला सुरूवात झाली आहे. चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाज रवींद्र जडेजाने ५ बळी घेतले आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र मोहम्मद सिराज आणि शमीने भारताला चांगली सुरूवात करून दिली. दोन धावांवर ऑस्ट्रेलिया संघाचे दोन्ही सलामवीर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर स्मिथ आणि लाबुशेन यांनी शानदार खेळी करत संघाला सावरले. पहिल्या सत्रात भारताने दोन बळी घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाने ७६ धावा केल्या.

दुसऱ्या सत्रात जडेजाने मार्नस लॅबुशेनला ४९ धावांवर बाद करत चांगली भागीदारी तोडली. त्याचबरोबर त्याने पुढच्या चेंडूवर मॅट रेनशॉल बाद केलं. काही वेळानंतर स्टीव्ह स्मिथही ३७ धावांवर बाद झाला.

त्यानंतर आश्विनने कॅरीला बाद केले. आश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४५० व्या विकेट्सच्या रूपाने बाद केले. त्यानंतर पॅट कमिन्स शुन्य धावांवर बाद झाला. तिसऱ्या सत्रात जडेजाने पीटर हँड्सकॉम्बला ३१ धावांवर बाद केले. यानंतर आश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलिया संघाचा १७७ धावांवर संपुष्टात आणला. या सामन्यात जडेजाने ५, आश्विनने ३ तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button