ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिक्षक दिन : संघर्षामध्ये जो टिकून राहिल तो समृद्ध होईल!

‘एसव्हीएसपीएम’चे संस्थापक विनायक भोंगाळे यांच्या भावना

गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : कर्तव्यनिष्ठ व्यक्तीला संस्थेने न्याय दिला पाहिजे. संघर्षामध्ये जो टिकून राहिल तो समृद्ध होईल. शिक्षक दिन एका दिवसापुरता मार्यादित न राहता ती संस्कृती बनली पाहिजे. कोणते काम करावे आणि न करावे, हे आपल्या हातात आहे. केवळ वेळ जात नाही म्हणून शिक्षक होवू नका. ते राष्ट्राचे आणि घराचे पर्यायाने स्वत:चे व संस्थेचे नुकसान करणारे आहे, अशा भावना स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी व्यक्त केल्या.

देशाचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायत्री इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात झाला.

हेही वाचा – ‘लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा’; अजित पवार यांचे आदेश

यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक कविता कडू व विश्वस्त सरिता विखे यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमात उस्फुर्त सहभाग घेतला. सर्व विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच, मनोरंजनच्या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन व नियोजन कार्य एसएससी विभागाचे उपमुख्याध्यपक बाळकृष्ण गोसावी व त्यांच्या टीमने केले.

Vinayak Bhongale said that whoever survives the struggle will prosper

शिक्षकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत..

अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला. शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली. एवढेच नव्हे, तर शिक्षकाच्या भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता. सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ ढोल-ताशाच्या गजरात शाळेत फुलांची उधळन करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांनी वर्गात आपल्या शिक्षकांना ओवाळून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button