breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नव्या संसदेच्या प्रवेशाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त!

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून नव्या संसदेतून कामकाज होणार सुरू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाच दिवस संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाला १८ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्याने या चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर संसदेच्या नवीन इमारतीत कामकाजाचा श्रीगणेशा होणार आहे.

हे विशेष अधिवेशन १९ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सरकार एक देश एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या विशेष अधिवेशनावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Maharashtra Kesari : यंदा धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. पण अधिवेशन कशासाठी हे गुलदस्त्यात असल्याने विरोधक केंद्र सरकारवर प्रचंड नाराज आहेत. तर एक देश एक निवडणूक यासह १० विधेयक मांडले जाण्याची चर्चा होतेय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button