breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

प्रकृती बिघडल्यानंतर संभावना सेठला जावे लागले कोकिलाबेन रुग्णालयात

मुंबई | नृत्यांगना, टीव्ही अभिनेत्री आणि यूट्यूब व्लॉगर संभावना सेठची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे मंगळवारी तिला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. दोन दिवसांत तिला दुस-यांदा रुग्णालयात न्यावे लागले होते. संभावनाचा नवरा अविनाश द्विवेदीने सोशल मीडियावर ही माहिती देताच तिचे चाहते काळजीत पडले. एका संभाषणात संभावनाने यामागील कारण सांगितले.

https://www.instagram.com/p/B_y7gVAHcCs/?utm_source=ig_embed

संभावनाने सांगितल्यानुसार, तिचे ब्लड प्रेशर खूप लो झाले होते. म्हणून तिला तातडीने रुग्णालयात जावे लागले. स्पॉटबॉयशी बोलताना ती म्हणाली, “माझे ब्लड प्रेशर खूप लो झाले होते, त्यामुळे मी बेशुद्ध पडले होते. माझ्या कानात खूप इन्फेक्शन झाले आहे. या क्षणी, माझे कान पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत.” संभावनाने या संभाषणात सांगितले की, नजीकच्या एकाही रुग्णालयाने त्यांना आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात जावे लागले. ती सांगते, “मला पहाटे चार वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण जवळच्या कोणत्याही रुग्णालयाने आमच्यासाठी दरवाजे उघडले नाहीत. त्यानंतर आम्ही कोकिलाबेन रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर मला तपासायला तयार झाले. तपासणीनंतर त्यांनी मला घरी जाण्याचा सल्ला दिला. कारण मी तिथे सुरक्षित नव्हते. म्हणून आम्हाला तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात जावे लागले.” काही वेळाने ती पुन्हा घरी परतली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button