breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Thirty first: ७७८ तळीरामांवर वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई

मुंबई | महाईन्यूज

थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ७७८ मद्यपींवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. शहराच्या विविध भागांत कारवाई करत प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. यातील सर्वाधिक ५६५ तळीराम उपनगरात सापडले आहेत. वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाई दहिसर विभागात करून तब्बल ५८ जणांना दणका दिला आहे.

मुंबईमध्ये विविध भागांत पोलिसांनी नाकाबंदी केली होती. मद्यपींना अडवून त्यांची तपासणी केली. यावर्षी वाहतूक पोलिसांनी शहरातील १८२ ठिकाणी २३८ श्वास यंत्रणेच्या साहाय्याने तपासणी मोहीम राबविली. त्याचबरोबर दारूच्या नशेत वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्यांचे चित्रण करण्यासाठी पोलिसांना १०० बॉडी कॅमेरे लावून देण्यात आले होते. दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी यावर्षी आधीपासूनच तयारी केलेली होती.

‘वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे यासाठी जनजागृती केलेली होती. तसेच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला सकाळी सहा वाजेपर्यंत पोलिसांनी राबविलेल्या अभियानामुळे शहरात कोणत्याही अपघाताची नोंद झाली नाही. अशी माहिती वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेली आहे.

वाहतूक शखा   कारवाई

सहार                      ३५

मुलुंड                      ३५

कांदिवली                ३३

चेंबूर                      ३५

दहिसर                   ५८

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button