breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये 62.03 टक्के रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

पिंपरी । प्रतिनिधी

पुण्यातील रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र चित्र काहीसे दिलासादायक आहे. शहरातील 1 हजार 654 जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 हजार 26 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 600 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 62.03 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

तसेच, 36.26 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला असून त्याचे प्रमाण 1.69 टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णांपैकी 81 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पहिल्यांदा गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये शिरलेल्या कोरोनाने आता झोपडपट्यांमध्ये शिरकाव केला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. जूनअखेरपर्यंत तीन हजार रुग्ण संख्या होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

अंदाजानुसार शहरात दररोज 90 ते 100 नवीन रुग्णांची भर पडत आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाळ्यात रुग्ण वाढण्याचीही शक्यता वर्तविली आहे. 10 मार्च ते 20 जून दरम्यान रुग्ण संख्या 1654 वर जावून पोहचली आहे. त्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरातील 1654 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1026 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 600 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील 28 जणांचा कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे. टक्केवारीनुसार पाहता तब्बल 62.03 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 36.26 टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button