breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतीक्षा बागडी ठरली पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ची मानकरी

कल्यानच्या वैष्णवी पाटीलवर केली मात

पुणे : महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगली येथे ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सांगलीतील प्रतीक्षा बागडी हिने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे.

सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणमधील वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

सांगली-मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये महिला महाराष्ट्र केसरी पदकासाठी कुस्ती स्पर्धा गुरूवारपासून सुरू होती. अंतिम सामन्यात तुंग, सांगली येथील प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची वैष्णवी पाटील यांच्यात लढत झाली. सायंकाळी ही अंतिम लढत झाली. या अंतिम लढतीत दोघी मध्यंतरापर्यंत चार गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, मध्यंतरानंतर बागडीने पाटीलला चितपट करीत चार विरूद्ध दहा गुणांनी महिला केसरी स्पर्धा जिंकली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button