breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संतोषी चाेरघे यांची महापालिकेच्या समाजसेवक पदाची सेवा संपुष्टात

जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने आयुक्तांची कारवाई 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट क मधील समाजसेवक संतोषी सुदाम चाेरघे यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना समाजसेवक पदावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणा-या कर्मचा-याचे धाबे दणाणले आहेत. 

महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील समाजसेवक पदावर कार्यरत असणा-या संतोषी सुदाम चाेरघे ह्या हिंदू महादेव कोळी या जातीच्या असून अनुसुचित जमाती प्रवर्गातून त्यांना समाजसेवक या आरक्षित पदावर नियुक्ती देण्यात आली होती. नियुक्ती आदेशापासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात पडताळणी समितीकडून करुन घेवून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, चाेरघे यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार संधी देवूनही मुदतीनंतर अद्यापपर्यंत त्या प्रमाणपत्र सादर करु न शकल्याने त्यांची खातेनिहाय चाैकशी सुरु करण्यात आलेली होती.

खातेनिहाय चाैकशी समितीत नमुद दोषारोप सिध्द झालेले आहेत. नियुक्ती आदेशातील अट क्रमांक 7 चा भंग केल्याने त्यांचे विरुध्द मनपा नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यास विभाग प्रमुखानी शिफारस केली आहे. समाजसेवक चाेरघे यांचे गैरवर्तन प्रकरणी खातेनिहाय चाैकशीत दोषारोप व नियुक्ती आदेशातील अटी व शर्तीनुसार भंग केलेला आहे. त्यामुळे चाेरघे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी 27 डिसेंबर 2018 पासून महापालिका सेवेतून काढून टाकण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button