breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘या’ महापालिकेतील भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर ?

जळगाव |

जळगाव महापालिकेत पूर्ण बहुमत असलेल्या भाजपला अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महापौर आणि उपमहापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार आहे. मात्र नवीन महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणुकीआधीच भाजपचे तब्बल 27 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जळगावात राजकीय भूकंपाचे चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला 4 दिवस शिल्लक असतानाच सत्ताधारी भाजपचे 57 पैकी 27 हून अधिक नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. भाजपकडून व्हीप बजावण्याआधीच हे नगरसेवक फरार झाले आहेत. शिवसेनेकडून सर्व नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला असून, महापौरपदासाठी सेनेच्या जयश्री महाजन यांचे नावदेखील निश्चित केले आहे. भाजप नेते निवडणुकीआधी भाजप नगरसेवकांची बैठक घेणार होते. मात्र, त्याआधीच नगरसेवक सहलीवर रवाना झाले. त्यामुळे आता निवडणुकीच्या दिवशी काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

वाचा- ‘शिवसेनेला मुकेश अंबानींकडून पैसे काढायचे होते’, निलेश राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button