breaking-newsराष्ट्रिय

सलग आठव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा भडका

नवी दिल्ली – आठ दिवसांपासून पेट्रोलची एकतर्फी सुरू असलेली दरवाढ आजही कायम राहिली. आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १२ ते १५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या रविवारपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे एक रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. मात्र आज सलग 22 दिवसांनंतरही डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असताना भारतात मात्र पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. जुलै महिन्यात अशाच प्रकारे डिझेलच्या दरात एकतर्फी वाढ झाल्यामुळे डिझेलने दराचा उच्चांक केला होता. तशीच काहीशी परिस्थिती पेट्रोलच्याबाबतीत निर्माण होताना दिसत आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोल १४ पैशांनी महागले. यामुळे तेथील पेट्रोलचा दर ८१ हजार रुपये ४९ पैसे एवढा झाला आहे. डिझेलचा दर मात्र ७३ रुपये ५६ पैसे आहे. मुंबईतही पेट्रोल १४ पैशांनी महागल्यामुळे त्याचा दर ८८ रुपये १६ पैसे लिटर झाला आहे. डिझेल ८० रुपये ११ पैसे लिटरने मिळत आहे. कोलकात्यात १४ पैसे, चेन्नईत १२ पैसे आणि बंगळुरूत १५ पैसे एवढी आज पेट्रोलमध्ये लिटरमागे दरवाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button