breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस, ४८ तासांत ४३४ मिमी पावसांची नोंद

पुणे : पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत लोणावळ्यात २२० मिलीमीटर पाऊस कोसळला असून ४८ तासांत इथं तब्बल ४३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २५९२ मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ १७४४ मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. लोणावळ्यामध्ये सलग दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या मोसमातील विक्रमी पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर भुशी धरणही ओसंडून वाहत आहे.

हेही वाचा – किरीट सोमय्या यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

लोणावळ्यातील भुशी धरण ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोणावळ्यातील छोटे-मोठे धबधबे सह्याद्रीच्या डोंगरावरून खाली पडत असल्याचं मनमोहक चित्र बघायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button