ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘… तर आणि तरच धार्मिक स्थळांना मिळणार भोंग्यांसाठी परवानगी’; पालिका आयुक्तांनी केले स्पष्ट

सोलापूर |  धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यावरुन सध्या राज्यात वादंग सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात भोंग्यांसाठी (लाऊडस्पीकर) परवानगी घेऊनच ते लावावेत, असे आवाहन शहर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळत असला, तरी पालिका आयुक्त पी. शिवशंकर  यांनी बांधकाम परवानगी असेल तरच भोंग्यांना परवानगी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासनाच्या या आवाहनानंतर आता धार्मिक स्थळांच्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सोलापूर शहरातील दहा टक्के मंदिरांनी, तर पन्नास टक्के मशिदींनी लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी मागितली आहे. शहरात जवळपास सहाशे धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये ३५९ मंदिरांपैकी ३१ मंदिरांनी लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मागितली आहे. तर एकूण १९२ मशिदींपैकी ९० मशिदींनी लाऊडस्पीकरसाठी परवानगी मागितली आहे. शिवाय शहरात २ गुरुद्वारा ,१८ चर्च आणि ३० बुद्धविहारांचा समावेश आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत परवानगी देण्याबाबच चर्चा करण्यात आली. त्या चर्चेत परवानगी देताना ज्या धार्मिक स्थळांकडे बांधकाम परवाना आहे अशांनाच भोंगे अथवा लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात येईल यावर भर देण्यात आला. तसेच आवश्यकतेनुसार वफ बोर्ड यांच्याकडील नोंदणीकृत व धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत संस्थानाच परवानगी देण्यात येणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका प्रशासन आणि पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शहरातील विनापरवाना म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळांचा मुद्दा नव्याने चर्चेला आला आहे. त्यात महानगरपालिकेला नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button