ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी कारखान्यावर छापा, बोगस उत्पादनं बनवणारा ‘मास्टरमाईंड’ मोकाट

अकोला |  अकोला पोलीस आणि कृषी विभागाच्या एका कारवाई संदर्भात संशयाचं चित्र निर्माण झालं आहे. गुरूवारी जिल्ह्यातील शिसा बोंदरखेड मार्गावरील एका शेतात विनापरवाना शेती उत्पन्न वाढविणारी खते, टॉनिक बनवणाऱ्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापेमारी करून आरोपीस अटक केली.

या कारवाईत ५ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र, या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचा बोलविता धनी अकोल्यातील एक मोठा कृषी व्यावसायिक असल्याची मोठी चर्चा आहे. मात्र, पोलीस आणि कृषी विभागाच्या कारवाईनंतरच्या चौकशीत या कृषी व्यावसायिकाच्या सहभागाचे धागे-दोरे दोन्ही विभागांना का मिळत नाही?, या कृषी व्यावसायिकाला वाचविण्याचा पोलीस आणि कृषी विभागाचा नेमका उद्देश काय?, याचा ‘अर्थ’ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पोलीस आणि कृषी विभागाचा बोगस कृषी कारखान्यावर छापा

डोंगरगाव सांगळुद रोडवरील शिसा बोंदरखेड शेतशिवारातील एका शेतात शेतकऱ्यांना बोगस कृषी साहित्य, खते आणि निविष्ठ बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता. हे सारं अगदी विनापरवाना आणि बिनबोभाटपणे सुरू होतं. या ठिकाणी शेती उत्पन्न वाढविण्याचा दावा करणारी बनावट खतं, टॉनिक बनविलं जात होतं. दरम्यान, या ठिकाणी असा कारखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यातूनच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटिल यांनी कृषी विभागाला सोबत घेत याठिकाणी गुरूवारी छापेमारी केली.

कारवाईच्या जबाबदारीची टोलवाटोलवी …

या प्रकरणात पुढची कारवाई काय?, यासंदर्भात आम्ही पोलीस अधिक्षकांचं विशेष पथक, कृषी विभाग आणि गुन्हा दाखल झालेल्या बोरगावमंजू पोलिसांशी संपर्क केला. मात्र, प्रत्येकाने यातील कारवाईसंदर्भात एकमेकांकडे टोलवाटोलवी केली. विशेष म्हणजे, एकानेही बोलतांना या प्रकरणाचा खरा ‘मास्टरमाईंड कोण?, यावर पुर्णपणे चुप्पी साधली आहे. या चुप्पीचा खरा ‘अर्थ’ पालकमंत्री बच्चू कडू आणि सरकाररला शोधावा लागणार.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button