Chief Minister Uddhav Thackeray, President of Mafia Sena, Kirit Somaiya attacks Thackeray government
ठाणे | गेले अनेक महिने मनसुख हिरेन यांच्या हत्तेवरून अनेक वाद राज्यात रंगले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयए करत असून उच्च न्यायालयात एनआयएकडून प्रतिज्ञा पत्र सादर करण्यात आले होते. यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनीच हिरेन यांची हत्या केली असून या हत्येसाठी त्यांनी ४५ लाखांची सुपारी घेतली असल्याचं नमूद करण्यात आले होते.
या हत्येच्या बातमीनंतर पुन्हा एकदा हिरेन कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळले आहे. या हिरेन कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज भाजप नेते किरीट सोमय्या हे ठाण्यात आले होते. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गरळ ओकून संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफिया सेनेची तुलना करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मनसुख हिरेन यांच्या परिवाराची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकाराशी संवाद साधला. मनसुख हिरेन यांच्या परिवाराची मागणी आहे की, याचा प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा कारण सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा हे पोलीस दलात येऊ शकले नसते. हे दोघेही पोलीस दलात येण्याच कारण म्हणजे माफिया सेना, माफिया सेना आणि माफिया सेनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांच्यावर कोर्टाने अॅक्शन घेतली होती. २००४ पूर्वी १५ वर्ष पोलीस दलात त्यांची पुन्हा नियुक्ती होऊ शकली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आऊट ऑफ द वेय’ जाऊन गैर कायदेशीर पद्धतीने या दोघांना पुनर्नियुक्ती केली. याप्रकरणी आपण स्वतः एनआयएला भेटून आग्रह करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांची नियुक्ती झाली त्यातली एक फाईल गायब झाली आहे त्याचाही तपास व्हायला हवा. या दोघांची नियुक्ती करताना वसुली हा एकमेव हेतू असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे. शंभर कोटींची वसुली ही सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांच्या अकाउंटवर जाणार नव्हती, या शंभर कोटींच वाटप अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या द्वारा होणार होत. याचाही तपास व्हायला हवा अशी मागणी एनआयएकडे करणार असल्याच किरीट सोमय्या यांनी यावेळी स्पष्ट केल.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली सुपारी…
ठाकरे सरकार सुपारी देणार सरकार असून संजय पांडे ने देखील सुपारी घेतली आहे का? मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांची अचानक हकालपट्टी झाली आणि तीन महिन्यांनी निवृत्त होणारे संजय पांडे यांची नियुक्ती कशी झाली? असा प्रश्न उपस्थित करत किरीट सोमय्या संजय पांडे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना आत टाकण्याची यांनी सुपारी घेतली होती का? असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी संजय पांडे यांना चैलेंज देतो, हिम्मत असेल तर माझ्यावर लावा राष्ट्रद्रोहाचा खटला लावून दाखवा. नवनीत राणा आणि रवी राणा राष्ट्रद्रोह, राजद्रोह हे कलम लागू होऊ शकत नाही असे कोर्टाने सांगितले.
आता कोर्टाने सांगितल्यानंतर त्यांनी हे राजद्रोहाचा गुन्हा लावले त्यांच्यावर कारवाई होणार की नाही. किरीट सोमय्यावर खार पोलीस स्टेशनच्या आत उद्धव ठाकरे यांचे ८० गुंड हल्ला करतात जीव घेण्याचा प्रयत्न करतात आणि संजय पांडे यांची पोलीस किरीट सोमय्या यांच्या नावे फेक FIR लावते. एक छोटासा दगड आला, चार लोकांना अटक करण्याची नौटंकी केली उद्धव ठाकरे सरकारने केली. कमांडोवर हल्ला झाला.
ज्या व्हिडिओमध्ये चैनल लाईव्ह दाखवलं त्यात दिसतंय. तो सीसीटीव्ही फुटेज सीआयएसएफ कमांडो मागत आहेत किरीट सोमय्या मागत आहेत दिले जात नाहीत. म्हणून नवनीत राणा आणि रवी राणावर राजद्रोह लावणारे संजय पांडे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याचं उत्तर द्यावं. आम्ही पुढच्या कोर्टात जाऊ हे उत्तर नाही. पोलिसांचा माफिया म्हणून वापर करणारे ठाकरे सरकारला याचे उत्तर द्यावे लागणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.