breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

झायडस केडिलाची लस सप्टेंबरमध्ये लाँच होणार, १-२ आठवड्यांत किंमत ठरणार

मुंबई – झायडस केडिलाच्या झायकोव्ही-डी लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ही लस बाजारात आणण्याचा आमचा विचार आहे. या लसीची किंमत १-२ आठवड्यांत निश्चित केली जाईल, अशी माहिती झायडस केडिलाचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी आज येथे दिली.

कोरोनावरील झायकोव्ही-डी या लसीची कंपनीची उत्पादन क्षमता १० ते १२ कोटी डोस एवढी आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत या लसीचे ४ कोटी डोस उपलब्ध होतील. नंतर जानेवारीअखेर ५ कोटी डोस उपलब्ध होतील, अशी माहिती पटेल यांनी दिली. या लसीचा दर ठरविण्याबाबत तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सरकारच्या संबंधित विभागांसोबत चर्चा करत आहे. लस उत्पादनाचा खर्च, वाहतूक आणि तंत्रज्ञान यांचा विचार करून लसीची किंमत ठरवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र डिसेंबरपर्यंत ४ कोटी आणि जानेवारी अखेरपर्यंत ५ कोटी लसीचे डोस उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे पटेल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button