breaking-newsराष्ट्रिय

भारतीय जवानांच्या पवित्र्याने पाकिस्तानी हादरले; थेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रच डागले

नवी दिल्ली | महाईन्यूज

दहशतवाद्यांना सीमेपलिकडून घुसखोरी करण्यासाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताना आज चांगलाच धडा शिकवला. कुपवाडामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या बंकरांवर थेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रेच डागण्यात आली. याचा व्हिडीओ एएऩआय या वृत्तसंस्थेने जारी केला आहे. पाकिस्तानकडून कुपवाडामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले आहे. वारंवार होणाऱ्या या गोळीबाराला आज भारतीय जवानांनी थेट क्षेपणास्त्रच डागून प्रत्यूत्तर दिले आहे. उंचावर चौक्या उभारून पाकिस्तानचे सैनिक गोळीबार करतात. यामुळे भारतीय जवान बचाव करण्यासाठी आणि प्रत्यूत्तर देण्यामध्ये व्यस्त असतात. याचाच फायदा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी होतो. यामुळे पाकिस्तानकडून नेहमी गोळीबार केला जातो. यास आज चक्क रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राने उत्तर देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button