breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड मनसेच्या शहराध्यक्षपदी सचिन चिखले यांची निवड

पिंपरी-  पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्ष पदी सचिन चिखले यांची निवड करण्यात आली. यापूर्वी शहरात दोन शहराध्यक्ष होते. परंतू, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एकच शहराध्यक्ष असणार आहे. मुंबईत ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चिखले यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकी पूर्वी मनसेचे दोन शहराध्यक्ष निवडले होते. यामध्ये सचिन चिखले आणि कैलास जाधव यांची निवड करण्यात आली होती. मात्र जाधव हे पक्षाच्या कोणत्याच प्रक्रीयेत सक्रीय होत नव्हते. त्याच्या परिणाम पक्षावर झाला. महापालिका निवडणुकीत अवघा एकच नगरसेवक निवडूण आला. सचिन चिखले यांच्या रूपाने मनसेची महापालिकेत एंट्री झाली. गेल्या वर्षभरात चिखले यांनी विविध आंदोलने तसेच अनेक समस्यांना वाचा फोडली. पक्ष संघटन, शाखा उभारणीत चिखले यांनी मोठे योगदान दिले. त्याचीच दखल घेत राज ठाकरे यांनी संपूर्ण शहराची जबाबदारी सचिन चिखले यांच्यावर सोपविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button