पिंपरी / चिंचवड

तळवडे येथे तरुणाला लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी लुटले. तरूणाकडील दोन मोबाईल आणि रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने काढून नेली. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास तळवडे चौकाकडून रुपीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

संदीप प्रभाकरराव देशमुख (वय 30, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी देशमुख तळवडे चौकाकडून रुपीनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून तिघेजण आले. देशमुख यांना रस्त्यात अडवून दगड हातात घेत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने देशमुख यांच्या खिशातील दोन मोबाईल फोन आणि दोन हजार 40 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button