Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यापीठे व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची डिपॉझिट मिळणार परत- लक्ष्मण जगताप

पिंपरी चिंचवड | अभ्यासक्रमांच्या प्रवेशावेळी राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांकडून विविध शैक्षणिक कारणांसाठी घेतली जाणारी अनामत रक्कम (डिपॉझिट) संबंधित विद्यार्थ्यांना परत देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांच्या या हक्काच्या रक्कमेवर डल्ला मारला जात असल्याची बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी समोर आणली आहे. याबाबत विधानसभेत प्रश्न विचारला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना देय असलेली अनामत रक्कम तत्काळ परत देण्याबाबत विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश देण्यात आल्याचे लेखी उत्तर दिले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडून विविध शैक्षणिक गोष्टींसाठीही अनामत रक्कम घेतली जाते. त्यामध्ये ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी, क्रीडा साहित्य यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये अनामत रक्कम म्हणून घेतली जाते. अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण शैक्षणिक करणांसाठी घेतलेली अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये टाळाटाळ करतात.

विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कमेपोटी घेतलेले कोट्यवधी रुपये राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पडून आहेत. विविध विद्यार्थी संघटनांकडूनही अनामत रक्कम परत मिळावी म्हणून मागणी केली जाते. पण विद्यापीठ व महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळावेत म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवला. त्यांनी याप्रकरणी अधिवेशनात अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button