breaking-newsपिंपरी / चिंचवड

घरच्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलेल्या युवकावर शहर मनसे व मुस्लिम बांधवानी केले अंत्यसंस्कार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका युवकावर दुःखद प्रसंग आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरच्यांनी अंत्यविधि करण्यास नकार दिला परंतु, शहर मनसेच्या पुढाकाराने परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी त्या युवकावर अंत्यविधि केला.

याबाबत माहिती देताना पिं. चिं. शहर मनसेचे उपाध्यक्ष विशाल मानकरी म्हणाले की, रूपीनगर परिसरातील महेश करांडे या युवकाच्या वडिलांचे मागच्याच आठवड्यात निधन झाले. त्यांचा अंत्यविधि झाल्यानंतर युवक पुन्हा परतत असताना त्याच्या रिक्षाचा अपघात झाला. त्यामधे तो जखमी झाला. त्याला उरळीकांचन येथील खासगी रुग्णालयात (दि. १० जुलै) भरती करण्यात आले. उपचार चालू असताना पुढील ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी पैसे भरण्यास सांगितले. एटीएम कार्ड घेवून येतो असे सांगून सख्या भावाने रुग्णालयातुन पळ काढला. तो पुन्हा रुग्णालयात आलाच नाही. उपचार चालू असताना दिनांक ११ जुलै रोजी त्या युवकाचा मृत्यु झाला.

परिसरातील युवकाच्या सर्व मित्रमंडळीनी त्याच्या भावाला तसेच तिन्ही बहिनींना, मामाला, मावशीला, चुलतभावाला त्याच्या निधनाची बातमी कळवली. परंतु, कोणीही मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नव्हते. शेवटी हताश होवून ही सर्व मित्रमंडळीनी शहर मनसेकडे मदत मागण्यास गेली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्व पाहुणे मंडळी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. सर्वमंडळी अंधश्रद्धा पाळणारी होती. तरीदेखील आम्ही खुप समजावून सांगितले. तरी, कोणीही त्याचा अंत्यविधि करण्यास तयार नव्हते.

अखेर मी व शहरसचिव राहुल जाधव, शहरसंघटक सुशांत साळवी, उपविभागाध्यक्ष सचिन मिरपगार, महिला सेना विभागअध्यक्ष काटे मामी, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील मुस्लिम बांधव नवाज तांबोळी, अस्लम तांबोळी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वाघमारे यांनी हॉस्पिटलला फोन केला. तेव्हा समजले की त्याला कमांड हॉस्पिटल येथे पोलिसांनी पोस्ट मॉर्टमसाठी नेले आहे. मग आम्ही त्या पोलिसांशी संपर्क साधला. त्यांना सांगितले की त्याच्या नातेवाईकांनी अंत्यविधि नाही केला तर आम्ही त्याचा अंत्यविधि करू. पोलिसांनी कोरोना चाचणी आणि पोस्टमॉर्टम करुन झाल्यावर मृतदेह ताब्यात दिला जाईल, असे सांगितले. रविवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी कमांड हॉस्पिटलला जावून सायंकाळी ७ वाजता मृतदेह ताब्यात घेतला व ८.३० वाजता निगडी स्मशानभूमित त्या युवकावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, रक्ताच्या नात्यापेक्षा मानुसकीचे नाते केव्हाही श्रेष्ठ याची प्रचिती पुन्हा एकदा आली. घरी सख्खे भाऊ, बहिण असूनदेखील त्यांनी अंत्यविधि करण्यास नकार दिला. परंतु, परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी त्या युवकाचा अंत्यविधि करण्यास पुढाकार घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button