breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चक्क अम्बुलन्समधून पूरग्रस्तांसाठी अन्नदान

  • संकटकाळी अम्बुलंन्स चालकांचा पूरग्रस्तांना एक हात मदतीचा

पिंपरी- असोसिएशन पिंपरी चिंचवड व ओम साई अंम्बुलंन्स सर्व्हिस काळेवाडी फाटा यांच्या माध्यमातून महाड व चिपळूण येथे पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नदानाची मदत सुपूर्द करण्यात आली. पाच रुग्णवाहिका भरून गुरुवारी सायंकाळी संघटनेच्या सर्व पदाधिकार्याच्या उपस्थितीत हा ताफा रवाना झाला.

यावेळी संघटनेचे सचिव संजय कुलकर्णी म्हणाले संकटकाळी, एक हात मदतीचा, हे संघटनेचे धोरण आहे. गुरुवारी या सर्व गाड्या महाड व चिपळूण या गावी रवाना झाल्या.या वेळी मोहन चव्हाण, हेमंत देशमुख, चिराग मित्तल, जोतिबा शिंदे, कृष्णा सूर्यवंशी, राकेश चंदनशिवे, अक्षय चिमले, नरेश जोशी, बिरु मनावर हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button