पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी

जून्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला चार जणांनी मिळून फरशीने मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री नऊ वाजता जुनी सांगवी येथे घडली.

सिद्धार्थ उमेश बांठिया (वय 19, रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय अहिवळे (रा. औंध), गफूर शेख, रामा कांबळे उर्फ आर के, अज्ञात व्यक्ती अशा चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बांठिया आणि त्यांचा मित्र तरुण गोपाळ असे दोघेजण रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या गच्चीवर शतपावली करत होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या ओळखीच्या आरोपींनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून गच्चीवर येऊन डोक्यात पाठीमागून फरशी मारली. तसेच हातावर कोयत्याने वार केला. डोक्यातही कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button