breaking-newsपिंपरी / चिंचवड

सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन, सायंकाळी ५ नंतर भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रशासनाकडून नागरिक, व्यवसायिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आदेश असताना देखील शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच सोशल डिस्टंसिंगला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यापासून पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांनी परिसरातील भाजी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. शनिवारी (दि.०४) सायंकाळी ५ नंतर परिसरात दुकाने सुरू ठेवणे तसेच सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करत दुकानात गर्दी झालेल्या १० भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

हिंजवडी पोलीसांनी याप्रकरणी गोविंद बिल्लू सरकार (वय ५३, लक्ष्मी चौक मारूंजी), बिप्लॉप पागलचंद विश्वास (वय ३५, विनोदे वस्ती मारूंजी), स्वप्निल अरुण भाकर (वय २०, आल्हाट वस्ती, मारूंजी), आकाश दीपक निकम (वय ८०, वेळवंडे वस्ती, हिंजवडी), वंदना राजेंद्र निकम (वय ४२, शिंदे वस्ती मारूंजी), सारिका दीपक धेडे (वय ३०,शिवार वस्ती मारूंजी), तुकाराम गुणवंतराव पांचक (वय ५२, वेळवंडे वस्ती, हिंजवडी), मोहंमद आलमीन इस्तीयाक अली घोषी (वय २१, काळेवाडी), विनोद भाई करासनदास रामानंदी (वय २५, लक्ष्मी चौक, हिंजवडी), प्रकाश ढगलाराम चौधरी (वय २८, वारजे माळवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्रशासनाकडून व्यावसायिकांना कडक नियम तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करण्याचे आवाहन आहे. मात्र या आदेशाला व्यावसायिकांकडून हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसत आहे. वाकड विनोदे वस्ती कॉर्नर येथील भाजीपाला गाळे, हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील भाजीपाला पथारी तसेच वाकड विनोदे वस्ती येथील स्पिरिया कॉम्प्लेक्स येथील भाजीपाला विक्रेत्यांवर हिंजवडी पोलिसांनी काल कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ५ वाजल्यानंतर बाजारपेठ बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. तसेच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ नये व ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर रहावे म्हणून नागरिकांना उभे राहण्यासाठी जागेवर सहा फूटावर खुणा करणे व सामाजिक अंतर पाळले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक केले आहे. असे असताना देखील प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन या परिसरात भाजीपाला विक्रेते करताना आढळून आले. सायंकाळी ५ नंतर भाजीपाला विक्री करणे आणि सोशल डिस्टंसिंग या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दहा व्यावसायिकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button